बेळगाव / प्रतिनिधी
शिवसेनेच्यावतीने बुधवारी बेळगावात १९६९ मध्ये मुंबई येथे झालेल्या सीमा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
सम्राट अशोक चौक येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले,उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह शिवसैनिकांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी उपशहर प्रमुख राजू तुडयेकर,उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, प्रदीप सुतार,चेतन शिरोळकर,विनायक जाधव,विक्रम हुंद्रे,निलेश केरवाडकर,सनी रेमाणाचे,संजय देसाई आदी उपस्थित होते.
समिती नेत्यांनीही केले अभिवादन
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन पार पडले.
यावेळी बोलताना माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले, शिवसेनेने नेहमीच सीमाप्रश्न सुटावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सीमाप्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या प्रेरणेतून आपण त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास माजी महापौर सरीता पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, किरण गावडे,राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, खानापूर समीतीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण यांच्यासह समिती आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments