कल्लेहोळ / गोपाळ पाटील
'ऑपरेशन मदत' संस्थेच्या हाकेला प्रतिसाद देऊन पोलिस उपायुक्त (DCP Shekhar TH) यांनी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाळू पसरलेला राज्य महामार्ग स्वच्छ केल्याने अपघाताचा धोका टाळला.
आज सकाळी शगुन गार्डन हाॅलजवळील खादरवाडी क्राॅस येथे उद्यमबाग रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून वाळू पडली होती. ती वाहनांच्या वर्दळीने सर्वत्र रस्त्यावर पसरली होती. या पसरलेल्या वाळूमुळे दुचाकी, इतर वाहने व सायकलस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
सदर बाब तेथून जाताना 'ऑपरेशन मदत' ग्रुपमधील एका कार्यकर्त्याच्या निदर्शनास आली. त्यांनी प्रथम थोड्या अंतरावरील वाहतूक पोलिस तसेच बेळगाव शहर पोलिस विभागात नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या उपायुक्त शेखर टी. एच. यांना फोनद्वारे या घटनेची माहिती दिली.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देताना पोलीस उपायुक्तांनी ताबडतोब उद्यमबाग पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन समस्येचे निराकरण करण्यास सांगितले. त्याप्रमाणे उद्यमबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन सदर परिसर स्वच्छ करून मार्ग वाहतुकीला मोकळा करण्यात आला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या पोलिस विभाग व महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची परिसरातील नागरिकांतून प्रशंसा करत आहेत.
या मार्गावरून परिसरातील शाळा-काॅलेजीसचे विद्यार्थ्यी, उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, आजुबाजूच्या गावातील लोकांची तसेच गोवा-मुंबई राज्य महामार्ग असल्याने रहदारी भरपूर असते, परिणामी पोलिस विभागाने तत्परतेने वाळू पसरलेला राज्य महामार्ग स्वच्छ केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments