बेळगाव : येथील शास्त्रीनगर महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेला हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला भारती नेगिनहाळ, शोभा डोंगरे, शितल आजगावकर सुरेखा यलजी, रेखा पाटील आणि मंडळाच्या इतर महिला सभासद उपस्थित होत्या.
हळदी - कुंकू समारंभानिमित्त सर्वांनी उखाणे घेतले. सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
0 Comments