जागतिक मराठी दिनानिमित्त बेळगाव कवी मंडळ व साहित्याक्षर प्रकाशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी स. १०.३० वा. 'कवी समजून घेताना 'हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रथम सत्रात प्रसिद्ध कवी , लेखक, अनुवादक आणि इतिहासकार डॉ. संजय बोरुडे (अहमदनगर) यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रिया मॅडम कार्यक्रमाच्या उद्घाटक तर प्रा. अशोक आलगोंडी समन्वयक आहेत. या कार्यक्रमाला रचना मॅडम (पाथर्डी) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात कवी संजय बोरुडे यांचे दोन तास कविता वाचन होणार आहे. त्यानंतरच्या सत्रात ते श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. डॉ. संजय बोरुडे हे हिंदी, मराठी व इंग्रजी या तीनही भाषेत लेखन करतात. त्यांचा इंग्रजी कवितासंग्रह जगप्रसिद्ध पेंग्विन व रँडम हाऊस यांनी प्रकाशित केलेला आहे. अनेक विद्यापीठात त्यांचे साहित्य अभ्यासाला आहे. 'कवी नव्हे, तर कविता मोठी झाली पाहिजे' या उद्देशाने साहित्याक्षर प्रकाशन दर महिन्याला भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असते . पदरमोड करून असे कार्यक्रम घेणारी मराठी मुलुखातील ही एकमेव प्रकाशनसंस्था आहे .
0 Comments