• प्रा. चंद्रकांत पोतदार यांचे मत 
  • प्रगतिशील लेखक संघाचे कवी संमेलन उत्साहात 

  (प्रगतिशील लेखक संघाच्या कवी संमेलनादरम्यान उपस्थित
कवी -कवयित्रींना मार्गदर्शन करताना,संमेलनाचे अध्यक्ष 
प्रा.चंद्रकांत पोतदार)

 (संमेलनाला उपस्थित असलेले मान्यवर, कवी - कवयित्री) 

बेळगाव / प्रतिनिधी

ऐकणे ही 'साधना' आणि लेखन ही  'तपस्या' आहे. तेव्हा एखाद्या विषयावर कविता लिहायची झाल्यास  त्याच्याशी निगडित अधिकाधिक कविता ऐकणे गरजेचे आहे. ज्याला कवितेच्या विषयातील नसं कळते त्याला वाट सापडते आणि कवितेला सल असली की ती अस्सल होते. असे मत प्रा.चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केले. येथील प्रगतिशील लेखक संघाचे दुसरे साहित्य संमेलन शनिवार दि. २८ व रविवार दि. २९ जानेवारी २०२३ असे दोन दिवस महात्मा ज्योतिराव फुले साहित्य नगरी मराठी विद्यानिकेतन, बेळगांव येथे पार पडले. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवार दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी संमेलनाचे मार्गदर्शक गझलकार प्रसाद कुलकर्णी (संपादक प्रबोधन प्रकाशन ज्योती,इचलकरंजी) यांच्यासह प्रगतिशील लेखक संघाचे सेक्रेटरी कृष्णा शहापूरकर उपस्थित होते.

प्रारंभी प्रगतिशील लेखक संघाच्या सदस्या रोशनी हुंद्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सदस्य प्रा. निलेश शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी संमेलनाचे मार्गदर्शक गझलकार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत पोतदार यांचा शाल, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रगतिशील लेखक संघाचे सेक्रेटरी कृष्णा शहापूरकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन मार्गदर्शक गझलकार प्रसाद कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. 

 (संमेलनाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत पोतदार यांचा सत्कार करताना
 संमेलनाचे मार्गदर्शक गझलकार प्रसाद कुलकर्णी,
समवेत प्रगतिशील लेखक संघाचे सेक्रेटरी कृष्णा शहापूरकर ) 
 

 (संमेलनाचे मार्गदर्शक गझलकार प्रसाद कुलकर्णी
यांचा सत्कार करताना प्रगतिशील लेखक संघाचे
सेक्रेटरी कृष्णा शहापूरकर)

याप्रसंगी कवी आणि कवयित्रींनी सादर केलेल्या कवितांचा आढावा घेताना प्रा. चंद्रकांत पोतदार पुढे म्हणाले, कविता हा विचार असतो आणि आजूबाजूच्या वातावरणाचाही कवितेवर परिणाम होत असतो. जेव्हा कवी अवतीभवतीचे प्रश्न तळहातावर घेऊन फिरतो तेव्हाच कविता तयार होते. मुळातच कवी हा संवेदनशील असतो आणि संवेदनशीलता असली की कवितेची रचना करणे सोपे होते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी 'कवटीत मेंदू सापडला की कळवतं चला' ही कविता त्यांनी सादर केली.

तत्पूर्वी ज्येष्ठ कवी दत्ता घोडके यांनी सादर केलेल्या 'नको येऊस तू'  या कवितेने कवी संमेलनाला सुरुवात झाली. यानंतर बाग परिवार, शहर परिसर आणि महाराष्ट्रातून आलेल्या ज्येष्ठ आणि नवोदित कवी आणि कवयित्रींनी विविध विषयांवरील आपल्या कवितांचे सादरीकरण केले.

यावेळी मार्गदर्शन करताना गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी कवितेची नेमकी व्याख्या सांगितली. कविता हा भावनेचा अविष्कार असून समाज आणि भाषा जोडणारा तो एक दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वप्न पाहताना सत्य हे सर्वात महत्त्वाचे असून सत्याशी बांधिलकी हवी हे कवींनी लक्षात घ्यावे, कविता ही शब्दबंबाळ असू नये.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारी आणि रसिकांची दाद मिळण्याजोगी असावी हेच कवी कडून अपेक्षित आहे. केवळ शब्द एकत्र केल्यावर कविता होत नाही त्याचा क्रम केल्यावर कविता तयार  होते असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. कवितेला कोणताही शब्द वर्ज नाही. विचारांशी बांधिलकी असली की कुठलेही बंधने पाळण्याची गरज नाही. 'कविता' ही 'कविता' असावी 'छंदोबद्धता' बंधनकारक नाही. स्वसमृद्धीतून विश्व समृद्धी होणार आहे. तेव्हा साहित्य व कवितेकडे पाहत इतिहासाचा गाळ उपसताना वर्तमानाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. देह नश्वर आहे पण कवी अमर आहे कारण तो काळाच्या पुढचे लिखाणं करत असतो असे सांगताना वाचन आणि लेखना मुळे मानवी जीवन समृद्ध झाले आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तेव्हा कोणीही नाउमेद केले तरी विचलित होऊ नका संवाद हा लेखनाचा मुख्य उद्देश असून कविता आणि साहित्य शरीराला व्यापून टाकणारा व्यायाम आहे. त्यामुळे माणूस परिपूर्ण होतो. लिहिण्याने मोजकेपणा येतो याची लेखकाने जाणीव ठेवावी. त्याचप्रमाणे कवी हा येणाऱ्या काळाचा प्रतिनिधी असतो. याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांनी म. फुले व म. गांधी यांच्या गझल मधील शेर सादर केले.

(संमेलनात कविता सादर करताना पहिल्या साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे )

यावेळी प्रगतिशील लेखक संघाच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनीही आपले विचार मांडले तसेच 'वेगळे आभाळ माझेसूर्य तोही वेगळाही कविता सादर केली

या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रामनीषा नाडगौडा आणि कवि भरत गावडे यांनी केलेतर आभार सागर मरगण्णाचे यांनी मानलेयाप्रसंगी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळळीखानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटीलविलास बेळगावकरॲडनागेश सातेरीसाहित्यिक गुणवंत पाटीलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राप्रवीण बांदेकर (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकसावंतवाडी), यांच्यासह बेळगाव शहर आणि तालुकासीमाभाग आणि महाराष्ट्रातून आलेले जवळपास ४४ कवी कवयित्री उपस्थित होतेप्रत्येकाने आपल्या खास शैलीत सादर केलेल्या कवितांनी कार्यक्रमात रंगत आणलीएकंदरीत संघाच्या सुयोग्य नियोजनामुळे खेळीमेळीच्या वातावरणात हे संमेलन पार पडलेस्नेहभोजनाने संमेलनाची सांगता झाली.