बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दि. २८ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. काल शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळी पाहणी केली तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे केल्याची माहिती दिली.
आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर समितीचे पदाधिकारी मुंबईला गेले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या विविध शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये बेळगाव येणाऱ्या कार्यकर्त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे सचिव ॲड. एम. जी. पाटील, माझी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, महादेव मंगाणकर, विकास कलघटगी आदि उपस्थित होते.
त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सुरेश माने, सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष अधिकारी अनिल जगताप यांच्या समवेत आझाद मैदान येथे जाऊन पाहणी केली.
0 Comments