• गोकाक पोलिसांची कारवाई
  • १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

गोकाक / वार्ताहर 

गोकाक ता. बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वार्टर्समध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणी गोकाक शहर पोलिसांनी शुक्रवार (दि. १०)  एका संशयिताला अटक केली.

महादेव मारुती  मुन्नोळी (वय ४७, रा. विवेकानंदनगर, गोकाक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार तीन महिन्यांपूर्वी बांधकाम खात्याच्या क्वार्टर्समध्ये  राहणारे सुतार काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर त्यांची पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली होती.

त्या रात्री घराच्या समोरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरी करण्यात आली. प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश यातनूर चा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.डी यांनी तात्काळ तपास सुरू केला होता. येथील योगीकोळ रस्त्यावर संशयास्पदरीत्या  फिरणाऱ्या मुन्नोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची खगोली दिली. त्याच्याकडून ७५ हजार रुपयांचे १४.५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, १२,५०० रुपये किमतीचे  २५० ग्रॅम चांदीचे दागिने, १५ हजार रुपयांचा मोबाईल व रोख १५ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला न्यायालय पुढे हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.