- ग्रामविकास अधिकारी कमिशनची मागणी करत असल्याचा आरोप
रायबाग / वार्ताहर
रायबाग तालुक्यातील मेखली ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांनी कमिशनची मागणी केल्याचा आरोप करत ग्राम पंचायत सदस्या सुधा सिद्धाप्पा राजंगळे यांनी सादर केलेले राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मेखली ग्रामपंचायतीत झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत सदस्या सुधा सिद्धाप्पा राजंगळे यांनी राजीनामा सादर केला. राजीनाम्याच्या पत्रात, तालुका पंचायत , ग्राम पंचायत योजनेंतर्गत १४, १५ व्या आणि रोजगार हमी योजनेच्या अनुदानासाठी परवानगी मिळविण्यासाठी प्रत्येकी १०% टक्के रक्कम ग्रामपंचायत विकास अधिकारी, पंचायतींना देण्यास सांगतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामासाठी पीडीओसाठी १०% आणि अभियंत्यांना १० %. एडी आणि ईओला ७% आणि टेक्निकलला ३% आणि एकूण ३०% देण्यास अधिकारी सांगत असल्याचा आरोप आहे. ते पैसे देण्यास असमर्थ असल्याने आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणी पीडीओ मंजुनाथ दलवाई यांनी फोनवर प्रतिक्रिया देताना हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले नसल्याचे उत्तर दिले.
0 Comments