येळ्ळूर / वार्ताहर 

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण संमेलन तयारी पूर्णत्वाकडे येळ्ळूर : येक्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळ्ळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी पूर्णत्वाकडे गेली आहे. साहित्यिक प्रा. डॉ. मिलिंद कसबे (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांचे तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे आपले अध्यक्षीय भाषण करणार असून दुसऱ्या सत्रात मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तिसन्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच प्रा. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचे कथाकथन व शैक्षणिक पुरस्कार वितरण होणार आहे.

चौथ्या सत्रात पुणे येथील इतिहासाचे अभ्यासक औदुंबर लोंढे यांचे खास शिवजयंती निमित्त ढाल, तलवारी पतीकडचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. पाचव्या सत्रात मुंबई येथील कवी प्रा. प्रशांत मोरे आई तुझा हात परिस हा कवितेचा कार्यक्रम सादर करणार आहेत. अठराव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक अँडिमानत सुधीर चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तरी या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून येळ्ळूर गावचे माजी ग्रामपंचायत माजी तालुका पंचायत सदस्य रावजी महादेव पाटील हे असणार आहेत. उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थित हा संमेलन सोहळा पार पडणार आहे. तेव्हा साहित्यप्रेमी रसिकांनी संमेलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य संघाचे अध्यक्ष परमाराम मोटराचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम गोरल, सचिव डॉ तानाजी पावले व सदस्यांनी केले आहे.