• अन्नधान्यासहित सर्व साहित्य जळून खाक  

खानापूर / प्रतिनिधी 

ईदलहोंड (ता. खानापूर) गावातील वीट कामगाराच्या झोपडीला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झालेईदलहोंड येथील शेतकरी संजय चांगाप्पा जाधव यांच्या शेतात वीट कामगार राहत होते. हे  कामगार वीटभट्टीवर काम करीत होते. त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याने अन्नधान्यासहित सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत्यांना शासनाकडून योग्य मोबदला मिळावा अशी मागणी होत आहे.