विजयपूर / वार्ताहर 

मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोघांचे मुंडण करून धिंड काढल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजू चव्हाण व राजू चव्हाण या दोघांचे मुंडण करून  बसवनगर, हेगडीहाळ तांडा विजयपूर येथे त्यांची धिंड काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामपंचायत अध्यक्षासह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. अनिल लमाणी, मंगेश, हेमू, रमेश, राजू, चन्नू, रामसिंग लमाणी ह्यांना अटक करण्यात आली आहे .

या प्रकरणी विजापूर ग्रामीण पोलिस स्थानकात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, तेजू चव्हाण व राजू चव्हाण या दोघांनी मुलीची छेड काढली, हा प्रकार समजताच आमदार देवानंद चव्हाण यांच्या मतदारसंघात हेगडीहाळा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष रामसिंग व तांडा प्रमुख यांच्या उपस्थितीत दोघांचे मुंडण करून चप्पलांचा हार घालून त्यांची हेगडीहाळ लमाणी तांडा येथील बसवनगरात धिंड काढण्यात आली होती.

या दोघांनी मुलीची छेड काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती .