विजयपूर / वार्ताहर
विजयपूर शहरातील कालिकानगर नजीक घरासमोर पार्क केलेल्या ऑटो रिक्षा आणि दुचाकीला आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञातानी आग लावली आणि तेथून फरार झाले. सदर ऑटो रिक्षा आणि दुचाकी रेणुका मेंडेगार यांच्या मालकीची आहे.
दरम्यान काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. वाहनांना आग लागल्याचे लक्षात येतात रेणुका यांनी तात्काळ शहरातील अग्निशामक दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने आगीत जळून भस्मसात झाली होती. या घटनेत रेणुका यांचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद आदर्श नगर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
0 Comments