चिक्कोडी / वार्ताहर
कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. चिक्कोडी तालुक्यातील बेळकोड गेटनजीक बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
शिवकुमार राजू घोष (वय २५) आणि त्याचा भाऊ अश्विनकुमार राजू घोष (वय २३) दोघेही रा. नवलीहाळ ता. चिक्कोडी अशी मृतांची नावे आहेत.
चिक्कोडी तालुक्यातील नवलीहाळ गावातून गोकाक तालुक्यातील शिंधीकुरबेट्टकडे दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते तर कार कब्बूर शहरातून चिकोडीच्या दिशेने जात जात होती अशी माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कारचालक आपली कार मागे घेण्यासाठी गेला असता, नियंत्रण सुटल्याने तो चुकीच्या दिशेने गेला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या प्रकरणाची चिक्कोडी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments