• भाजप प्रदेश कार्यकरणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन

चंदगड / लक्ष्मण यादव

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने भाजप प्रदेश कार्यकरणीचे सदस्य, शिवाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून चंदगड तालुका भाजपतर्फे सोमवार दि. २७ व मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

सदर शिबीर इनाम सावर्डे (ता. चंदगड ; जि. कोल्हापूर) येथे शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर सकाळी १०.०० ते सायं. ४.०० या वेळेत  होणार आहे.

या शिबिरात वेगवेगळ्या आजारांच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्यामार्फत रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया शासनाच्या योजनांच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. तरी या महाआरोग्य शिबिराचा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस लक्ष्मण यादव यांनी केले आहे.