हुबळी / वार्ताहर 

पतीने पत्नी आणि मुलांवर शस्त्राने वार करून गळफास लावून गळफास घेऊन आत्महत्या केली तर जखमी झालेला मुलाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

फकीराप्पा मादार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केलेपहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नी मुडकव्वा हिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर त्याने आपल्या तीन मुलांवरदेखील हल्ला केला. 

घटनेनंतर त्याची पत्नी आणि मुले रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती. या घटनेनंतर फकीराप्पाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली .फकीराप्पाचा जखमी मुलगा श्रेयस (6) चा उपचाराचा उपयोग न झाल्याने मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि इतर मुले श्रावणी (8), सृष्टी (4) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हुबळी ग्रामीण स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करून पुढील तपास सुरू केला आहे