•  अन्य चार जण जखमी  

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहराच्या हद्दीत भीषण अपघात घडला आहे . दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने , या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


सोमवारी रात्री उशिरा बैलहोंगल शहरातील इंचल रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात
, संदीप (18) , आनंद (18) ह्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे . प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले सीपीआय पंचाक्षरी सालीमठ , पीएसआय मल्लुर, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.