बेळगाव / प्रतिनिधी 

भारतीय सेनादलाला  ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आज रविवार दिनांक २२ रोजी मराठा लाईट इन्फंट्री मध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये भारतीय सैनिक दलात कार्यरत असलेले जवान, माजी जवान, नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता


रविवार दिनांक २२
 रोजी सकाळी ६ वाजता मिनी मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. कर्नल स्वप्निल यांच्या हस्ते ध्वज उंचावून मिनी मॅरेथॉनला चालना देण्यात आली. मराठा लाईफ इन्फंट्री मधील सर्व जवान नागरिक व विद्यार्थ्यांसह १८० नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता