- आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील उचगाव गाव ते श्री मळेकरणी मंदिर या रस्त्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 60 लाख रुपये मंजूर झाले आहेत.आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत काँक्रीट रस्ता व गटार बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले.
मळेकरणी देवी हे या भागातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीनुसार इथला रस्ता विकसित करण्यात येत आहे. हेब्बाळकर म्हणाल्या, दर्जेदार रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक युवराज कदम, बाळकृष्ण तिरसे, सुनिल देसाई, संतोष पाटील, अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, मंदिराचे विश्वस्त समिती उपस्थित होते.
0 Comments