निपाणी / प्रतिनिधी

निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे बोरगाव इचलकरंजी रस्त्यानजीक लेल्या संतोष खंडेलवाल यांच्या मालकीच्या खंडेलवाल बायो फर्टिलायझर आणि हर्बो केम इंडस्ट्रीज या कारखान्याना शनिवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

खंडेलवाल बायो फर्टिलायझर आणि हर्बो केम इंडस्ट्रीज या कारखान्यात शेतीसाठी लागणारी सेंद्रिय औषधे तयार करण्यात येतातशनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या कारखान्यांना अचानक शॉर्ट सर्किटने आग लागलीबघताबघता आगीने रौद्ररूप धारण केलेत्यात कारखान्यातील मोठे प्लास्टिक कॅन्सपॅकिंग बॅगनवीन टाटा आयशर वाहन व अन्य साहित्य जळून खाक झालेऔषधे बनविण्याचे मशिनचारचाकी वाहन मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.

अग्निशामक दलाने माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवलीमात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेयाप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे