- भाजी मार्केट विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी
बेळगाव / प्रतिनिधी
जय किसान भाजी मार्केटमध्ये प्रवेश शुल्कावरून वादंग होऊन पहाटे गेट बंद आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शेतकरी व परराज्यातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश शुल्क आकारू नये अशी भूमिका आंदोलन करणाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे काही तास वाहतूक कोंडी झाली. सकाळी ९ नंतर भाजी मार्केटचे व्यवहार सुरू झाले.
भाजी मार्केटमध्ये लहान वाहनांना १० ते ३० रुपये प्रवेश शुल्क तर ट्रक ना ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत होते. पहाटे प्रवेश शुल्कावरून वादावादी झाली त्यानंतर काही वाहन चालकांनी जय किसान भाजी मार्केटच्या मुख्य गेटवरच वाहने आडवी लावून सर्वांना रोखून धरले त्यामुळे दोन्ही बाजूला भाजी मार्केटमध्ये येणारी वाहने अडकून पडली. वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. जय किसान मार्केटच्या संचालकांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ३-४ तास आंदोलन सुरूच होते.
भाजी मार्केटमध्ये मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधीची गरज आहे. त्यामुळे प्रवेश शुल्काच्या माध्यमातून निधी उभा करून तो विकासाच्या कामावर खर्च करणार असल्याची माहिती आंदोलन कर्त्यांना देण्यात आली. चर्चेनंतर सकाळी ९ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर भाजी मार्केटचे दैनंदिन व्यवहार सुरू झाले.
0 Comments