• मोबाईल शॉपीतील चोरीचा प्रयत्न फसला
  • विजयपूर शहराच्या शास्त्रीमार्केट परिसरातील घटना

विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर शहरातील शास्त्री मार्केट परिसरात एका मोबाईल शॉपीमध्ये अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो निष्फळ ठरला.



याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ७.०० वा. सुमारास "शांतवीर" या मोबाईल शॉपी मध्ये कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी परिसरातील नागरिकांनी संशय आल्याने त्याला थांबवून चौकशी केली असता  त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली.

यानंतर नागरिकांनी गांधीचौक पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची गांधी चौक पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलिसांकडून चोरट्याची कसून चौकशी सुरू आहे.