खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भाजप नेते विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांचा ६१ वा वाढदिवस भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह भाजप नेते किरण यळ्ळूरकर, राजेंद्र रायका, जोतिबा रोमानी, वासंती बडगेर, सौ देसाई, वसंत देसाई, आप्पया कोडोली, लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरेस गुंडू तोपिनकट्टी, सदानंद मासेकर, प्रकाश निलजकर, प्रकाश तिरवीर,बाळू सावंत,गजानन पाटील,तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संचालक, सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रास्ताविक व स्वागत किरण यळ्ळूरकर यानी केले. यावेळी नेत्यानी वाढदिवसानिमित्त त्याच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. यावेळी सत्कार मुर्ती विठ्ठलराव हलगेकर यानी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितानी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवाच्याशुभेच्या दिल्या. आभार राजेंद्र रायका यानी मानले.