![]() |
फोटो सौजन्य : मोहन हरजी,(सांबरा) |
सांबरा / मोहन हरजी
प्रतिवर्षीप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेनंतर आज गुरुवार दि.१२ जानेवारी रोजी सांबरा (ता. बेळगाव) गावचे भाविक सौंदत्ती यल्लमादेवी डोंगराकडे रवाना झाले.
या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच गावात भाविकांची लगबग सुरु होती. यामध्ये विशेषतः महिला वर्गाची धावपळ दिसून आली. गावातील गल्लोगल्ली तसेच प्रमुख मार्गांवर यल्लम्मा डोंगरावर जाण्यासाठी ठरविण्यात आलेली वाहने उभी असलेली पाहायला मिळाली. यात्रेसाठी जाण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर रेणुका मातेच्या जयघोषात अन् भंडाऱ्याच्या उधळणीत गावातील प्रत्येक गल्लीप्रमाणे भाविकांनी आपापल्या वाहनातून सौंदत्तीकडे प्रस्थान केले. उद्या शुक्रवार दि. १३ जानेवारी रोजी डोंगरावर पडल्या भरण्यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
गत दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे सर्व सण, उत्सव व यात्रांवर निर्बंध असल्याने सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवी यात्रा मोठ्या प्रमाणात भरविण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्व भाविकांचा हिरमोड झाला होता. पण यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
0 Comments