बेळगाव : मंगळवार पेठ टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सेवंतीभाई चतुरदास शहा (वय ८६) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी १० वा. अंत्ययात्रा निघणार असून शहापूर मुक्तिधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सेवंतीभाई शहा बेळगाव मधील अनेक संस्थांमध्ये सक्रिय होते. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे ते संचालक होते. एसकेई सोसायटीचे अध्यक्ष, जैन श्वेतांबर संघाचे माजी अध्यक्ष, जी. जी. चिटणीस शाळेचे माजी अध्यक्ष, सिटीझन फोरम आधी विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले.
0 Comments