हुबळी / वार्ताहर 

परिवहनच्या बस चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपीला धारवाड जिल्हा न्यायालयाने शिक्षा जाहीर केली असून आरोपीला एक वर्ष कारावास  आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

२०१६ साली, लक्ष्मण मोरब नावाच्या व्यक्तीने धारवाड कृषी विद्यापीठ नजीक एका परिवहन बस चालकावर क्षुल्लक कारणावरून हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर बस चालकाने धारवाड उपनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

आरोप सिद्ध झाल्यानंतर धारवाड जिल्हा न्यायालयाने लक्ष्मण मोरब या आरोपीला एक वर्षाची साधी कैद व ५ हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले.