• आ.अभय पाटील यांची मागणी 
  • शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सादर केले निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अभय पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन त्यांनी सादर केले.

धर्मांधांना शहाणपण शिकवायचे असेल तर उत्तर प्रदेश मॉडेलनुसार दोषींची मालमत्ता जप्त केली पाहिजे. देवी-देवतांच्या प्रतिमांची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आ. अभय पाटील यांनी केली आहे.

शहर पोलीस आयुक्त डॉ.बोरलिंगय्या यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले.शिवाजी महाराजांचा एक अश्लील एडिट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आरएक्स इम्रान, किंग की जान , इस्लाम जिंदाबाद नावाच्या आयडीवर ही पोस्ट टाकण्यात आली आहे. बेळगावात या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .