सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) ता. जि. बेळगाव येथील श्री गणपती मंदिरात उद्या दि. २५ जानेवारी २०२३ रोजी श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ठीक ८.०० वा. गणहोम आणि महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० पर्यंत महाप्रसाद तर सायंकाळी ठीक ५.०० वा. महिला भजनी मंडळाच्या हरिपाठाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सहकारी पतसंस्था, महिला मंडळ, भजनी मंडळ तसेच गावातील सर्व युवा वर्ग यांच्या व्यवस्थापन व सहकार्यातून हे सर्व कार्यक्रम होणार आहेत.
तरी सर्व ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त मौजे सुळगा (हिं.), ग्रामस्थ व गाव पंच कमिटी,मौजे सुळगा (हिं.) ता. जि. बेळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments