बेळगाव / प्रतिनिधी 

पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. बेळगाव उज्वलनगर नजीक राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला. पुण्याहून बेंगळूरच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात व्यक्तीला धडक दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली.अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यक्तीच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 

रुग्णवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची तसेच अज्ञात वाहनाची ओळख पोलीस तपासातून होणे आवश्यक आहे.