खानापूर : येथील मलप्रभा मैदानावर अंजलीताई फाउंडेशनच्या वतीने संपन्न झालेल्या प्रो - कबड्डी स्पर्धेत कुमारी आकांक्षा अर्जुन गणेबैलकर (रा. निटूर ; तालुका खानापूर) हिचा महिला पंचवीस संघातील  सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पंचवीस हजार रुपये मानधन व खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत आहे. आत्तापर्यंत तालुका जिल्हा ५००० मीटर मध्ये प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय उत्तम धावपटू , ॲमेचुअल राज्य स्पर्धेमध्ये मंगळूर येथे टॉप टेन मध्ये पाचवा क्रमांक असे अनेक किताब तिने पटकाविले आहेत. अखिल भारतीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये तिची निवड झाली असून  खानापूर व  बेळगाव या ठिकाणी अनेक मॅरेथॉन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 

कुमारी आकांक्षाला मार्गदर्शक ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर गर्लगुंजी कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्राध्यापक अरविंद पाटील, प्राचार्य एन. ए. पाटील तसेच तिचे आई -वडील बहिण गावातील सुरेश देसाई, अशोक नार्वेकर समस्त गावकरी आणि क्रीडाप्रेमी यांचे प्रोत्साहन लाभत आहे. आजही बेळगाव लेले ग्राउंड येथे अनिल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वभारती कला क्रीडा प्रतिष्ठान बेळगाव यांचे सहकार्य लाभत आहे वरील गौरव बद्दल सर्वत्र तिच्या अभिनंदन होत आहे.