• आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बहुतांश गावात काँक्रीटचे दर्जेदार रस्ते बनवण्यात आले असून ते दीर्घकाळ टिकतील, असा विश्वास आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कंग्राळी (खुर्द) गावच्या नारायण गल्लीतील रस्त्याच्या विकास कामाचे आज मंगळवारी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

भविष्यातही मतदारसंघाचा विकास करण्याचे ध्येय असून पुढील विकासासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सदर रस्त्याच्या विकासासाठी पंचायत राज अभियांत्रिकी विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. यावेळी बाळूपाटील, ज्योती पाटील अनिता पाटील, मनोहर पाटील, विशाल भोसले, जोतिबा पाटील, सुरज दळवी आदी उपस्थित होते.