• चिरमुरकर गल्ली खानापूर येथील घटना 

खानापूर / प्रतिनिधी 

चिरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारू घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले. अग्निशामक दल व नागरिकांनी सदर आग विझवली.

चिरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिराच्या बाजूला दिलीप येळळूरकर यांच्या घराच्या समोरील भागात असलेल्या  भाडोत्री दिलेल्या दुकानात (रामगुरवाडी ता. खानापूर) येथील नामदेव नारायण माळवे यांच्या टेलर दुकानाला आज सकाळी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून नवीन कपडे, शिवण्यासाठी आणलेले कापड तसेच दोन शिलाई मशीन, आधी साहित्य जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर घरमालक दिलीप येळळूरकर यांच्या घरासमोरील छत व दुकान जळून त्यांचे सुद्धा हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.


अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ त्या ठिकाणी  धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. खानापूर पोलिसांनी  घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. आज रविवार आठवडा बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती.