विजयपूर शहरातील स्टेशनरोड नजीक एका हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आज बुधवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार स्टेशन रोडनजीक असलेल्या ख्रियाज हॉटेलला आज सकाळी आग लागली. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट पसरले होते. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत हॉटेलचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेची नोंद गोलघुमट पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments