खानापूर / प्रतिनिधी
येत्या दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या गडकोट मोहिमेत सहभागी होणाऱ्या धारकऱ्यांनी आपली नावे नोंदविण्यासंदर्भात तसेच मोहिमेच्या पूर्वतयारी संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यास आणि या वर्षीच्या मोहिमेत आपली धारकरी म्हणून जबाबदारी काय याची जाणीव करून घेण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे उद्या रविवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १० वा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हारुरी येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी हारूरी, शेडेगाळी, मंतुर्गा, ढोकेगाळी, नेरसा या गावांसह सर्व विभाग, प्रमुख गावप्रमुख, गल्ली प्रमुख व यावर्षी मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धारकऱ्यांनी व हिंदवी स्वराज्य खडा पहारा योजनेत नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक शिवपाईकाने या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments