विजयपूर / दिपक शिंत्रे
आधी निवडणूक जिंकून तर दाखवा असे जाहीर आव्हान उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी आज आ. बसवनगौडा पाटील यतनाळ यांना दिले.
विजयपुरात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुरगेश निराणी म्हणाले की, लिंगैक्य सिद्धेश्वर श्रींच्या भूमीत राहून त्यांचा सरळ साधा प्रवचन ऎकुनही त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही.राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही काय होता हे समजून घ्या आणि आत्मपरीक्षण करा, येणाऱ्या काळात विजयपूरचे मतदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना चांगला धडा शिकवतील, असा इशारा निराणी यांनी दिला.
निराणी बच्चा आहे या यत्नाळ यांच्या विधानावर बोलताना निराणी म्हणाले, तुम्ही फार हुशार आहात ना, मग तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, निराणी हा जगातील पहिल्या क्रमांकाचा निराणी उद्योग समूह बनणारा आहे. मी माझी स्वतः निराणी कंपनी कष्टाने उभारली आहे, हरिहरला जा किंवा स्मशानात जा असे बोलताय, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, भाजपचे अनेक नेत्यांवर नेहमीच टिका करत असतात तुम्ही कोणाला बोलत आहात, कोणत्या पक्षाचे आहात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. भाजप पक्ष मला आई समान आहे. तुमच्यासारखे सारखे मी बोलत नाही असा टोला त्यांनी हाणला.
बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या भरमसाठ टीकेवर मंत्री निराणी यांनी ‘जोर का झटका, धीरे से लगे’ असा पलटवार केला आहे.
या पत्रकार परिषदेत माजी मंत्री अप्पासाहेब पटृणशेटी, भाजपचे नेते सुरेश बिरादार, चंद्रशेखर कवटगी, भिमाशंकर हदणूर, विवेक डब्बी उपस्थित होते.
0 Comments