•  गळफास घेऊन संपविले जीवन 

विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी शहरातील स्टील फर्निचर व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश चन्नाप्पा इवानी (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंदगी शहरातील बंदाळ रोडवरील दानेश्वरी स्टील फर्निचरचे ते मालक होते.  त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कर्जाच्या बोजामुळे  त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सिंदगीच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाची सिंदगी पोलीस स्थानकात नोंद झाली असून  पोलीस अधिक तपास करत आहेत.