आ. अनिल बेनके आयोजित, अनिल बेनके क्रिकेट ट्रॉफी २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना मोहन मोरे इलेव्हन संघ विरुद्ध झाइन संघात झाला. हा अंतिम सामना मोहन मोरे संघाने जिंकला. तर उपविजेतेपद झियान संघाला मिळाले .
मोहन मोरे संघाने पाच लाख रुपयांचे पहिले बक्षीस तर झाइन संघाने, अडीच लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. तर ,मालिकावीर ठरलेल्या करण मोरे याला रॉयल एन्फिल्ड दुचाकी मिळाली. फरदीन काझी याला सामनावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसाद शिरवळकर तर झाइन संघातील मुन्ना शेख याची उत्कृष्ट फलंदाज म्हणून तर मोहन मोरे इलेव्हन संघातील प्रज्योत आंबेल्ली याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या सरदार मैदानांवर आयोजित क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याने , विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आ. अनिल बेनके यांची प्रशंसा केली.
आ.अनिल बेनके पुरस्कृत अनिल बेनके ट्रॉफीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले , बेळगावमध्ये १५ वर्षांपूर्वी क्रिकेट स्पर्धा होत होत्या. मात्र त्या बंद पडल्या होत्या. मात्र आ. अनिल बेनके यांनी क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु करून , बेळगावमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो तसेच बेनके साहेबांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत असे सांगितले.
तर अनिल बेनके ट्रॉफी च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील म्हणाले बेळगावच्या लोकांना एक नवी दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे. पंधरा वर्षांपूर्वी क्रिकेट स्पर्धा होत होत्या. त्या पुन्हा सुरु करण्याचे काम आ. अनिल बेनके यांनी केले आहे. कर्नाटकात इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येणार प्रेक्षकवर्ग कुठेच नाही. यासाठी मी बेळगावकरांना धन्यवाद देतो . त्यांनी प्रत्येक सामना पाहताना प्रत्येक खेळाडूला मैदानात प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर क्रिकेट स्पर्धेचे आयोजक, आ. अनिल बेनके यांनी या स्पर्धेसाठी जम्मू काश्मीरपासून बेंगळुरपर्यंतचे संघ सहभागी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेसाठी खेळाडू आले होते. बेळगावच्या जनतेने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी समस्त बेळगावकरांना धन्यवाद दिले. त्याच बरोबर देशभरातून स्पर्धेसाठी आलेल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले.
यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघातील क्रिकेटपटूंनी , आमदार अनिल बेनके यांनी या क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्तम रित्या आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी प्रेक्षकवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने क्रिकेट खेळताना खूप प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले . पुन्हा या मैदानावर या क्रीडा स्पर्धेत खेळायला आवडेल असे मत त्यांनी व्यक्त केले .
0 Comments