सुळगा (हिं.) / वार्ताहर

बस्तवाड (ता. बेळगाव) येथे नूतन 'ग्रामवन' आणि बँक ऑफ इंडिया च्या 'ग्राहक सेवा केंद्राचे' उद्घाटन बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, या सेवा केंद्राद्वारे जनतेला त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, शेत जमिनीची नोंदणी, ऑनलाईन अर्ज, बस, रेल्वे, विमान तिकीट बुकिंग सेवा मिळू शकतात. याशिवाय बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवेद्वारे आर्थिक व्यवहारही करता येतात याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सागर जी. तहसीलदार, बाहुबली पाटील, परशुराम पी., ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ, रामा काकतकर, शिवा काकतकर, गुंडू चौगुले, निंगाप्पा चौगुले, संजू बंडाचे,  जोतिबा चौगुले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.