विजयपूर / वार्ताहर
शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील बबलेश्वर गावात आलमेल पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. शंकरम्मा सुरगहल्ली असे नुकसानग्रस्तांचे नाव आहे.
या घटनेत घरातील कोंबडी, मेंढ्यांसह, १ लाख रुपये व सोन्याच्या दागिन्यांसह, मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनेनंतर तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची नोंद आलमेल पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments