• नावनोंदणीसाठी उद्या अखेरचा दिवस 

बेळगाव / प्रतिनिधी 

सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन इतिहास आत्मसात करण्याबरोबरच मराठी विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धा परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी  महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शनिवार दि. १४ जानेवारी  रोजी भव्य सीमाभाग मर्यादित प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले असून मराठा मंदिर,रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ, खानापूर रोड बेळगाव येथे ही स्पर्धा होणार आहे.


स्पर्धेसाठी प्राथमिक गट (इयत्ता १ ली ते ७ वी), माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १०), महाविद्यालयीन गट इयत्ता ११ वी ते पदवीपर्यंत (वय वर्षे २३ च्या आत) असे तीन गट असणार आहेत . प्राथमिक आणि माध्यमिक गटांची स्पर्धा सकाळी १०.३० वा. तर महाविद्यालयीन गटाची स्पर्धा दुपारी २.०० वा. होणार आहे.


प्राथमिक गटासाठी रु. ३०/-, माध्यमिक गटासाठी रु. ५०/-, महाविद्यालयीन गटासाठी रु. ६०/- प्रवेश फी आहे. स्पर्धेतील नाव नोंदणीसाठी उद्या मंगळवार दि. १० जानेवारी ही अंतिम मुदत असून इच्छुकांनी ९३५३१७४७३५, ७३३८१४५६७३, ९८८६१०३३७३ या क्रमांकाशी संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.