- ६ भाविक ठार ; १६ जण जखमी
- रामदुर्ग तालुक्यातील चुचनूरनजीक घटना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात चुचनूरनजीक झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले. ४ जानेवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली. हे सर्वजण सौंदत्ती यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी वाहन एका वटवृक्षाला धडकल्याने सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक भाविकाला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
हनुमव्वा म्यागाडी (वय २५), दीपा (वय ३१), सविता (वय १७), सुप्रीता (वय ११), मारुती (वय ४२) आणि इंद्रव्वा (वय २४) अशी मृतांची नावे आहेत.
अपघाताची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाच लाखांची भरपाई
रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूरनजीक झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे.
0 Comments