- उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर पटकावला प्रथम क्रमांक
- राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
सुळगा (हिं.) / वार्ताहर
मुडलगी (ता. बेळगाव) येथे आज जिल्हा मर्यादित एक गाव एक ग्रामपंचायत अशी भव्य खुली खो-खो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सुळगा ग्रा. पं. संघ म्हणून सहभागी झालेल्या गावातील युवकांच्या खो-खो संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. आता हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
खरोखरच या युवकांच्या संघाने अभिमानास्पद कामगिरी करून आपल्या गावचे नाव उज्वल केले आहे. यशस्वी संघातील सर्व खेळाडूंचे गावात सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत असून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 Comments