- महात्मा फुले रोड येथील घटना
- वाहनांचेही मोठे नुकसान
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महात्मा फुले रोड येथील स्टेट बँकेसमोर आज दुपारी ऑटो रिक्षा आणि बुलेटची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालक गंभीर झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, महात्मा फुले रोडवर दुभाजकाच्या बाजूने ऑटोरिक्षा वळवत असताना भरधाव बुलेटने ऑटो रिक्षाला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की ऑटो रिक्षा रस्त्यावरच उलटली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments