• अभ्यासाला कंटाळून संपविले जीवन 


विजयपूर / वार्ताहर 

खासगी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलीविजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील नागरबेट्ट येथील खासगी महाविद्यालयात ही घटना घडलीपद्मावती संजय मेटी (वय १७, रा. कोमलापूर ,ता. लिंगसूर, जि. विजयपूरअसे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिट्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या चिट्ठीमध्ये तिने स्वतःच्या मृत्यूला स्वतः कारणीभूत असल्याचे लिहिले आहे. विज्ञानाचा अभ्यासक्रम अवघड जात असल्याने आत्महत्या करत असल्याचेही तिने या चिट्ठीत लिहिले आहे. घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी मुद्देबिहाळच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत