- खवय्यांना लाभलीय पर्वणी
बेळगाव / प्रतिनिधी
सुमारे २०० हून अधिक खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, कपडे चप्पल हे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या आणि खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या रोटरी अन्नोत्सव २०२३ चे खा. मंगला अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी या अन्नोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव २०२३ चे शुक्रवारी खा . मंगला अंगडी यांच्या हस्ते थाटात उदघाटन पार पडले . सावगाव रोड ,नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर ह्या अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . फीत कापून मान्यवरांनी या अन्नोत्सवाचे उदघाटन केले . त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांची प्रशंसा करताना एवढा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. इव्हेंट चेअरमन पराग भंडारी यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी क्लब तर्फे अन्नोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी देशाच्या विविध राज्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात येतात. शाकाहारी, मांसाहारी, स्टार्टर्स त्याचप्रमाणे गृहपयोगी वस्तू, मनोरंजनासहित मुलांसाठी खेळ असे २०० हून अधिक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. बेळगावसह मुंबई, नाशिक, पुणे, सातारा कोल्हापूर, बेंगळूर, तुमकुर, गुजरात आणि अन्य ठिकाणचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे मांडण्यात आले आहेत. ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अन्नोत्सवातून मिळणारा नफा सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येतो अशी माहिती त्यांनी दिली.
खा. मंगला अंगडी यांनी या अन्नोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी अरिहंत हॉस्पिटलचे संचालक डॉ. एम.डी. दीक्षित, उत्तम पाटील, कर्नल शमविजय सिम्हा, टेम्पो कंपनीचे वैभव सर्वोजी, यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रोटरीचे प्रांतपाल वेंकटेश देशपांडे, माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, मनोज हुईलगोळ, उमेश सरनोबत, सुभाष चांडक, आनंद सराफ, नितीन शिरगुरकर, मिलिंद पाटणकर, राजीव पोतदार, डॉ. शशिधर शेट्टी, डॉ. विजय देसाई आणि इतर सदस्य उपस्थित होते.
0 Comments