बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील सरदार्स हायस्कूल मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व्हावी, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
शहरातील सरदार्स मैदानावर आज शुक्रवारी अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करून ते बोलत होते. मुंबई आणि बंगळुरूमध्ये खेळलेले क्रिकेटपटू सरदार्स मैदानात खेळण्याची इच्छा व्यक्त करतात. देश-विदेशातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळलेले खेळाडू बेळगावच्या सरदार्स मैदानात खेळणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रिकेट प्रेमींनी शांतपणे क्रिकेट स्पर्धा पाहावी. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. क्रिकेट स्पर्धा नीटनेटक्या व्हाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.खासदार मंगला अंगडी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, राजशेखर पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments