- सुदैवाने जीवितहानी टळली
रायबाग / वार्ताहर
नातेवाईकांमध्ये झालेल्या किरकोळवादाचे पर्यावसान मारामारीत झाले यानंतर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मारामारीत आरोपी श्रीशैल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रायबाग तालुक्यातील हारूगिरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या सावसूद्दी गावात गोळीबाराचा हा थरार घडला. आरोपीने परवाना असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या घटनेची नोंद हारूगेरी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments