- ५ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई
बेळगाव / प्रतिनिधी
शिमोगा येथील नेहरू स्टेडियमवर ,झालेल्या चौथ्या कर्नाटक मास्टर्स गेम वयस्कर खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये बेळगावच्या वयस्कर धावपटूंनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ५ सुवर्ण आणि 3 रौप्य पदके पटकावली आहेत.
या स्पर्धेत हिंडलगा, बेळगाव येथील धोंडीराम शिंदे यांनी ७५ वर्षांवरील गटात १०० मीटर धावणे प्रकारात रौप्य पदक, १० किमी धावणे प्रकारात रौप्य पदक आणि २०० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
सुळगा (हिंडलगा) येथील मारुती कणबरकर यांनी ७५ वर्षांवरील गटात भालाफेकमध्ये सुवर्ण पदक आणि ५ किमी चालणे प्रकारात रौप्य पदक पटकावले.
उचगाव येथील सुरेश देवरमणी यांनी ७० वर्षांवरील गटात १० किमी धावणे प्रकारात सुवर्ण पदक, ५ किमी धावणे प्रकारात सुवर्ण पदक, ५ किमी चालणे प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.याबद्दल त्यांचा नेहरू स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. हे तिघेही बेळगाव तालुक्यातील वयस्कर धावपटू असून, या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments