• भारतातील नामांकित विद्यापीठांच्या ६ हजार बनावट गुणपत्रिका जप्त ,एकाला अटक 
  • केंद्रीय गुन्हे शाखेची बेंगळूर येथे कारवाई 
  • बनावट मार्क्सकार्ड रॅकेटचा पर्दापाश करण्यात यश

बेंगळूर / प्रतिनिधी 

केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बनावट मार्क्सकार्ड रॅकेट चालवणाऱ्या पाच संस्थांवर छापे टाकले आणि भारतातील नामांकित विद्यापीठांच्या सहा हजार बनावट गुणपत्रिका जप्त केल्या. गेल्या काही दिवसांत सीसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मार्क्सकार्ड रॅकेटच्या पोलीस तपासात बेंगळूरच्या विविध भागांतील पाच संस्था या रॅकेटमध्ये सामील असल्याची  माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिसांनी राजाजी नगर येथील न्यू क्वेस्ट टेक्नॉलॉजी, जे. पी. नगर येथील सिस्टीम क्वेस्ट, चंद्रप्पा लेआउट येथील आरोही इन्स्टिट्यूट, दासरहळळी येथील विश्व ज्योती विद्यालय आणि विजयनगर येथील बेनाका करस्पॉन्डन्स कॉलेजवर धाड घातली. त्यांच्याकडून विविध विद्यापीठांच्या ६,८०० बनावट गुणपत्रिका, २२ लॅपटॉप, संगणक आणि १३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

शुक्रवार दि. २७ रोजी सीसीबी पोलीस अधिकाऱ्यांनी, एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही विकास भगत या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी अनेक वर्षांपासून या रॅकेटमध्ये सहभागी होता. आमच्या प्राथमिक तपासणी नुसार पाच संस्था नामांकित विद्यापीठांची पदवी गुणपत्रिका २५ हजार ते ३५ हजार पर्यंत रक्कम घेऊन देण्यात येत होत्या अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.