• मलनाड प्रदेशाभिवृद्धी मंडळ शिवमोगा कर्नाटक सरकार बेंगळूर यांचा निधी
  • विधान परिषद सदस्य प्रकाश बा. हुक्केरी यांनी केली शिफारस
फोटो सौजन्य : श्री. पी. एम. मुतगेकर,
मुख्याध्यापक ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगा (हिं.)

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूलच्या दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. आज कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा सहाय्यक शिक्षक संघ बेंगळूरचे, जनरल सेक्रेटरी रामू घुगवाड यांच्याहस्ते २५ लाख रु. अनुदानाचा धनादेश शेतकरी शिक्षण सेवा समितीचे अध्यक्ष देवाप्पा ठाणू पाटील आणि मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित  होते. 

सदर अनुदान मा. प्रकाश बा. हुक्केरी विधान परिषद सदस्य वायव्य शिक्षक मतदारसंघ बेळगाव यांनी केलेल्या  शिफारसीनुसार मलनाड प्रदेशाभिवृद्धी मंडळ, शिवमोगा कर्नाटक सरकार बेंगळूर यांच्या निधीतून प्राप्त झाले आहे. वर्ग खोल्यांच्या संख्येत भर पडल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.