मिरज / प्रतिनिधी
मिरजेतील श्री साई प्रकाशन नवरत्न परिवार यांच्यातर्फे पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी स्मृती पुरस्कार विश्रामबाग सांगलीच्या सत्संग ग्रुप स्त्री सखी महिला मंडळाला प्रदान करण्यात आला. ॲड. शुभदा कुलकर्णी वडूज यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्या उगार महिला मंडळ उगार खुर्दच्या अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर अंजली गोखले यांनी श्री साई प्रकाशन नवरत्न परिवाराच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
श्रीमती गिरजाबाई महादेव जोशी ऐनापूर यांचा अध्यात्मिक सेवा पुरस्कार सुरेश हरी हसबनीस माधवनगर सांगली यांना तर नवरत्न आदर्श शिक्षिका पुरस्कार अकोल्याच्या प्राध्यापिका दिपाली सोसे यांना तसेच नवरत्न जेष्ठ साहित्य सेवा पुरस्कार मिरजेच्या रघुनाथ मिटकरी यांना प्रदान करण्यात आला. नवरत्न सामाजिक सेवा व साहित्य सेवा पुरस्कार संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांत मिरज शहर महानगर अध्यक्ष राजश्री शिखरे व पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
पश्चिम प्रांत मिरज महानगरचे श्रीधर देसाई ,सुहास दिवेकर ,हेमंत गोखले ,एडवोकेट सीजी कुलकर्णी, मिलिंद शिराळकर ,डॉक्टर पूनम लेवल ,डॉक्टर विद्या गोसावी, सौ. अनघा रा जोपाध्ये ,सौ अरुणा कुंभोजे, श्रीमती दिपाली जाधव, डॉक्टर अनिता नातू , ॲड. सचिन हंडीफोड ,दिगंबर कुलकर्णी उपस्थित होते. तसेच यवतमाळच्या प्राची तंबाखूवाला हीला फंटूश गुणवंत बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. धनंजय पाठक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन स्वानंद कुलकर्णी वैशाली गद्रे अरविंद चाटे अस्मिता आळतेकर यांनी केले.
0 Comments